‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय अतिक्रमणमुक्त

vaijapur karyalay

औरंगाबाद : मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र वैजापूर महसूल उपविभागाचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी ही संकल्पना चांगलीच मनावर घेतली आहे. आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमणावर त्यांनी कारवाईचा बडगा उचलत परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ या संकल्पनेअंतर्गत कार्यालयाच्या प्रांगणातील अस्वच्छता दूर करने व परिसराला आकर्षक स्वरुप देणे असे प्राथमिक स्वरुप असते. मात्र माणिक आहेर यांनी यापुढे एक पाऊल पुढे जात कार्यालय परिसरात थाटलेल्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उचलला आहे. या कारवाईत त्यांनी चहा विक्रेत्यांसह सेवा केंद्राचे अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईत त्यांनी कार्यालयाला नवे रुप देताना कार्यालयाच्या प्रांगणातील व्यवसायिकांना बाजुला हटवले केले आहे.

अधिकारी माणिक आहेर यांनी वैजापूर महसूल उपविभाग येथील कार्यभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथम कार्यालयातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन दस्तऐवज, संचिका नीटनेटक्या ठेवण्याची काटेकोरपणे शिस्त अधिकाऱ्यांना लावली. वैजापुर तहसील कार्यालयगी अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले असल्यामुळे कार्यालय शोधण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. उपविभागीय कार्यालया प्रमाणे तहसील कार्यालयाला पडलेला अतिक्रमणांचा विळखाही दुर होणार का? अशी उस्तुकता नागरिकांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या