fbpx

मेधा कुलकर्णींच्या निषेधार्थ पुण्यात ‘स्टंट’ आंदोलन

पुणे : आमदारांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन म्हणजे ‘स्टंट’ असल्याचे वक्तव्य आ. मेधा कुलकर्णी यांनी  महाराष्ट्र देशाशी बोलताना केले होते. या वक्तव्याचे पडसाद आज पुण्यात दिवसभर उमटले. आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यामध्ये या विधानाचा निषेध करण्यासाठी स्टंट आंदोलन करण्यात आलं.

आमचे प्रश्न सभागृहात मांडावे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो मात्र अतिशिक्षित सुसंस्कृत असलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आमच्या आंदोलनाला स्टंट म्हंटल मात्र आंदोलन आणि स्टंट यांच्यात काय फरक असतो हे सांगण्यासाठी आणि त्यांना अक्कल यावी साठी हे आंदोलन केले आहे. अस यावेळी मराठा क्रांती मोर्चा कडून स्पष्ट करण्यात आलं.

चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्यांमुळेच मराठा आंदोलन चिरघळले – शेट्टी