धोनीने स्टंप गोळा करण्याचा छंद का थांबवला?

गेली अनेक वर्ष भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या आणि सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडत असलेल्या एमएस धोनीला सामना जिंकल्यानंतर स्टंप गोळा करण्याचा छंद आहे. सामना झाल्यावर चाहत्यांनी अनेकवेळा धोनीला स्टंप जमिनीतून उपसून घेऊन जाताना पहिले आहे.

परंतु गेली २-३ वर्ष धोनीला अशी कृती करताना कुणी पहिले नाही. अगदी श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात चांगली कामगिरी करूनही धोनीने स्टंप पीचवरून उपासाला नाही. याचे मुख्य कारण आहे सध्या महाग झालेल्या या डिजिटल स्टंपची किंमत.

वर्ल्ड कप २०१५मध्ये पाकिस्तान संघावर विजय मिळवल्यानंतर धोनीने स्टंप ऐवजी बेल्स घेतल्या. परंतु मैत्रीपूर्ण संभाषणात पंच इयान गोऊल्ड यांनी धोनीला असे कारण्यापासून रोखले.

याचे मुख्य कारण म्हणजे या एलईडी स्टंपच्या सेटची असलेली किंमत. या स्टंपची किंमत $४०,००० (२४ लाख रुपये) एवढी मोठी आहे तर बेल्सच्या जोडीची किंमत अंदाजे ५०,००० रुपये आहे.

यामुळे अधिकारांच्या परवानगी शिवाय धोनी हे स्टंप्स किंवा बेल्स घेऊ शकत नाही. याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे हे स्टंप बनवायला आणि याचा शोध लावायला अंदाजे ३ वर्ष खर्च झाले. याचे पेटंट केलेले आहे. आयसीसीने मैदानात वापरण्यात येणाऱ्या अधिकृत वस्तूंबद्दल अतिशय काटेकोर नियमावली बनवली आहे.

ती गोष्ट नक्की खोटी की खरी?
काही माध्यमांनी धोनीने निवृत्त झाल्यानंतर स्टंप्स गोळा करण्याचं सोडलं असल्याची बातमी दिली होती. धोनी निवृत्त झाल्यावर अगदी पहिल्याच सामन्यात हा दिग्गज खेळाडू भारत सामना जिंकल्यावरही स्टंप उपसून घेऊन जाताना दिसला नाही. याबद्दल नक्की खरे किती आणि खोटे किती हे आजपर्यंत समोर आले नाही.

म्हणून धोनी करायचा स्टंप गोळा..
बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत धोनीने एकदा स्वतःच आपण स्टंप का गोळा करतो याचे कारण सांगितले. धोनी म्हणाला की क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर हे स्टंप कोणत्या सामन्यातील आहे हे ओळखण्याचा खेळ खेळणार आहे. कारण स्टंप गोळा करणे ही चांगली गोष्ट असली तरी मी त्यावर ते कोणत्या सामन्यातील आहे याची कोणतीही खूण करत नाही. म्हणून मी स्टंपवरील लोगो आणि सामन्यांचे विडिओ पाहून ते नक्की कुठले आहेत हे पाहणार आहे. माझ्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर हा एक चांगला विरंगुळा होईल.

You might also like
Comments
Loading...