आरोग्य विभागाच्या भरतीचे प्रवेश पत्र पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला आले यश 

आरोग्य विभागाच्या भरतीचे प्रवेश पत्र पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळणार; युवासेनेच्या पाठपुराव्याला आले यश 

mpsc

पुणे  – राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असणारी आरोग्य विभागाच्या गट क आणि ड ची पद भरती दिनांक २५ आणि २६ सप्टेंबर रोजी होणार असून लाखो तरुणांनी यासाठी अर्ज केले आहेत. पद भरती परीक्षा अगदी दोन दिवसांवर असतांना या प्रक्रिये साठीच्या संकेतस्थळावर काही अडचणी येत आहेत. परीक्षा काही दिवसांवर राहिलेली असतांना प्रवेश पत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रासाला सामोर जावं लागतं आहे. हे खेदजनक असून याबाबत त्वरित उपाययोजना करण्यासंदर्भात आज युवसेनेच्या कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांच्याशी संपर्क साधला. पुढील दोन दिवसात या सर्व अडचणी दूर होतील आणि विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळतील असे त्यांनी यावेळी आश्वस्त केले असल्याची माहिती यादव यांनी दिली.

यादव म्हणाले, राज्यातील विद्यार्थी कोरोनाच्या भीषण संकटा सोबत लढता लढता बेरोजगरीशी देखील झुंज देत आहेत अशा स्थितीत अखेर परीक्षा होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. एककीकडे राज्यसरकार तरुणांना दिलासा द्याचा प्रयत्न करत असताना परीक्षा यंत्रणा आणि प्रशासन यांचे विद्यार्थ्यांच्या कडे वारंवार दुर्लक्ष होताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ६,१४४ पदांसाठी दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी पद भरती परीक्षा होत आहे. परीक्षेच्या अंतिम तयारीसाठी काही दिवस शिल्लक असतांना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यास येत असलेल्या अडचणी मुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचा उल्लेखचं नाही तर काही विद्यार्थ्यांचे फोटो नाहीत. या सगळ्या अडचणीमुळे नेमकी परीक्षा द्यायचं कुठे ? विद्यार्थ्यांच्या तपासणी विना फोटो प्रवेश पत्रावर कसे होणार ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. यामुळे त्यांच्या सकारात्मक मानिसकतेवर देखील परिणाम होत आहेत. त्यामुळे याबाबत मी आज डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधून या सर्व अडचणी दूर करण्याबाबत चर्चा केली. त्यांनी पुढील दोन दिवसात या सर्व अडचणी दूर होतील आणि विद्यार्थ्यांना विना सायास परीक्षा देता येतील अशी ग्वाही दिली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी वारंवार याबाबत पाठपुरावा करणार असून कुठलीही अडचण निर्माण न होता पद भरती परीक्षा पार पडेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन देखील यादव यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या