‘२०२१मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये’, व्हायरल झालेल्या नोकरीच्या जाहिरातीवर बँकेचे स्पष्टीकरण

बँक

तमिळनाडू : गेल्या वर्षापसून देशात कोरोना महामारीचे संकट असल्याने शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे नुकसान न होण्यासाठी ऑनलाइन क्लासचा पर्याय अवलंबला जात आहे. यातच विद्यार्थ्यांची परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जात आहे. यामुळे देशातील अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्गात मिळालेल्या गुणांवर आधारित गुण देऊन पास केलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता व्यक्त केली आहे. अशातच काही दिवसापासून सोशल मिडियावर एचडीएफसी बँकेच्या नोकरीची जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या नोकरीसाठी अर्ज करू नये, असं स्पष्टपणे लिहिले होते. ही जाहिरात एचडीएफसी बँकेच्या तमिळनाडूतील मदुराई शाखेनं काढली होती. अवघ्या काही मिनिटांत ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सोशल मिडियावर एचडीएफसी बँकेवर टी मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर ही बाब लक्षात घेत बँकेनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

एका वृत्तानुसार बँकेनं आपली चूक मान्य केली असून, जाहिरात टाईप करताना या जाहिरात चूक जाहली असल्याचे सांगण्यात आले आहे.  आता बँकेनं एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली असून यात 2021 साली पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, असं स्पष्ट लिहिण्यात आलं आहे. बँकेकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता या नोकरीसाठी 2021 साली पास झालेले विद्यार्थी कोणतीही शंका मनात न आणता यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या