प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक दिवस वाढून मागितल्यामुळे विद्यार्थी निलंबित

fti pune

पुणे : एफ टी आय मधील ५ विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमातील प्रकल्प वेळेवर पूर्ण केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत विदयार्थी एकत्र आले असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक दिवस जास्तीचा मागितल्यामुळे एफटीआय प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

Loading...

बुधवारी एफटीआय च्या अध्यक्ष पदी अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि याच दिवशी विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई  करण्यात आल्याने या विषयाला वेगळे वळण मिळण्याची श्यक्यता होती. मात्र, खेर यांच्या नियुक्तीचा या कारवाईशी काहीही संबध नसून अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबित झालेल्या विद्यार्थ्यांमधील विवेक केरकर यांच्याशी सवांद साधला असता तो म्हणाला, आम्हाला अभ्यासक्रमात डायलॉग प्रकल्प असतो जो पूर्ण करण्यासाठी  दोन दिवस देण्यात आले होते मात्र सदर प्रकल्प मुदतीत पूर्ण होत नसल्यामुळे आम्ही एक दिवस वाढून मागितल्यामुळे ३ दिवसात वसतिगृह खाली करा म्हणून आम्हाला प्रशासनाकडून मेल आले आहेत. आमच्या मीटिंग चालू असून पुढील रूपरेषा जाहीर होईल.Loading…


Loading…

Loading...