राज ठाकरे विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत जाणार, मनसेचा आंदोलनाला पाठिंबा

टीम महाराष्ट्र देशा- अप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवर दादर-माटुंगा दरम्यान केलेले ठिय्या आंदोलन अखेर साडेतीन तासांनंतर मागे घेण्यात आले. रेल्वे भरतीच्या संदर्भातील अनेक मागण्या प्रलंबित असल्याने देशभरातील विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले घाईच्या वेळेला मुंबईकरांना वेठीस धरले. दरम्यान राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहे असे आश्वासन दिले. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आपण स्वत: या विषयाकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी आंदोलकांची एमआयजी क्लब इथं आंदोलकांची भेट घेतली. रेल्वे आंदोलन मागे घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आंदोलकांची भेट घेतली. प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला मनसेनं पाठिंबा दिला.आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचं राज म्हणाले तर आंदोलनकर्त्यांना घेऊन पक्षाचे नेते दिल्लीला जातील, मनसे नेते दिल्लीत जाऊन रेल्वे मंत्र्यांची भेट घेतील आणि समस्या सोडवण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करतील अस आश्वासनही राज यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं.

पूर्वीपासूनच रेल्वेमध्ये ट्रेड अप्रेटिंसपदाची भरती केली जाते. या युवकांना रेल्वेच्या मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रिक विभागात तात्पुरती नियुक्ती दिली जाते. सेवा कालावधीत त्यांना प्रशिक्षित केले जाते. यासाठी त्यांना मानधनही दिले जाते. गेल्या अनेकवर्षांपासून रेल्वेत ही पद्धत आहे. पूर्वी अशा अप्रेटिंसना रेल्वेत सामावून घेण्याचे अधिकार सरव्यवस्थापकांना (जीएम) होते. त्यामुळे अनेकांना रेल्वेत काम करण्याची संधी मिळाली. वर्ष २०११ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात यात बदल करण्यात आला आणि अप्रेटिंसला रेल्वेत नोकरी देण्याचे जीएमचे अधिकार काढून घेण्यात आले. आंदोलक विद्यार्थ्यांनी हीच पद्धत पुन्हा सुरू करण्याची आग्रही भूमिका मांडली आहे.