पर्यावरण पूरक गणेश विसर्जनात विद्यार्थांनी सहभागी होऊ नये

pune-education-department-580x395

पुणे : गणेश विसर्जनला जवळपास आठवडा होत आला मात्र गणेश विसर्जनावरून सुरु असलेले वाद आता चांगलाच चर्चेत आला आहे. विभागाकडून विद्यापीठाला विद्यार्थांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जनात सहभागी होऊ नये असे पत्र देण्यात होते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना आदेश जाहीर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बाबतीत राज्याचे शिक्षणमंत्री यांनी विनोद तावडे यांनी शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शिक्षण विभागाने आडाणीपणा दाखवत हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरून विद्यार्थांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जनात सहभागी न होण्याचा फतवा काढला होता. त्यामुळे पुण्यातील उच्च शिक्षण विभाग हिंदू जनजागृती समितीच्या सांगण्यावरुन काम करते काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या मुलीच्या हस्ते पर्यावरण पूरक गणेशवसर्जन करून जनतेला चांगला संदेश देतात. दुसरीकडे मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याकडून या उलट कृती केल्या जाते.

पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास मंडळा कडून सर्व महाविद्यालयांना आदेश देण्यात आले. अभ्यासक्रमात विद्यार्थांना पर्यावरण पूरक, प्रदुषणाला आळा बसावा म्हणून शिकवण्यात येते. मात्र याबाबतीत शिक्षण विभागाणे असमजपणा दाखवत सर्व महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करावी असे आदेश देण्यात आले होते. सोबत शिक्षण विभागाने महाविद्यालयांना मार्गदर्शनासाठी हिंदू जनजागृती समितीचं पत्रही जोडलं होते. यावर हिंदू जनजागृती सभेने आपली भूमिका स्पष्ठ करत महटले, मुर्ती शाडूच्या असाव्या मात्र मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे.

हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांची २९ ऑगस्टला पुण्यात भेट घेतली. त्यानंतर हिंदू जनजागृती समितीनं नारखेडेंना भेटून पर्यावरण पूरक विसर्जन न करण्यासाठी आणि विद्यार्थ्यानी धर्मपरंपरेप्रमाणं होणारं विसर्जन रोखू नये यासाठी विद्यार्थ्यांना आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण विभागानं हा आदेश काढला आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार शासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कार्यक्रम स्वीकारला असतांना शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने मनमानी केल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात पुणे विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रभाकर देसाई यांचाशी सवांद साधला असता ते म्हणाले विद्यापीठाने जारी केलेलं पत्र हे सह संचालकाकडून आले होते. त्यामुळे तो शासन निर्णय होता. आणि जेंव्हा एखाद्या उच्च अधिकाऱ्याच पत्र येत. तर ते काही अभ्यास करून आलेलं असत. त्यामुळे आलेल्या पत्राची दखल आम्हाला घ्यावी लागते. सदर पत्रातून कोणाच्या भावना दुखावू नये एवढाच उद्देश होता. इको गणेश उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. यावर्षी हि साजरा केला आणि समोर हि करत राहू हि विद्यापीठाची ठाम भूमिका आहे.
सदर प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर उच्चशिक्षण विभागाला जाग आली आहे. पुणे विभागाचे सहसंचालक डॉ.विजय नारखेडे यांना या फतव्यासंबंधी कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एका वाहिनीला दिली.