दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा- विनोद तावडे

vinod tawade

मुंबई: दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची प्रतीक्षा आज संपली असून यापुढे इयत्ता दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम असणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नवीन पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच काही विद्यार्थ्यांना या पुस्तकाच वाटपही केले. त्यामुळे आजपासून नवी पुस्तके किरकोळ पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहेत.

बालभारतीच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके वेळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. शिवाय पुस्तकांच्या किंमतीतली वाढ ही स्वाभाविक आहे. कारण, पुस्तकांची गुणवत्ता, कागद यांवर खर्च झालेला आहे, असे विनोद तावडे म्हणाले.

दहावीच्या पुस्तकातील सर्व धडे आता शिक्षकांना शिकवावे लागणार आहेत. कोणताही धडा यापुढे ऑप्शनला टाकता येणार नाही. तसेच ऑनलाईन पद्धतीवर आधारित दहावीचा अभ्यासक्रम तयार केल्याचे तावडेंनी सांगितले. नवीन अभ्यासाच्या पुस्तकाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून पालकांच्या खिशाला झळ बसणार आहे.