अकरावी प्रवेशासाठी औरंगाबादेतील विद्यार्थ्यांची ग्रामीण भागाकडे धाव!

students

औरंगाबाद: दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी रांगा लावतात. असे असले तरी कोरोनामुळे ग्रामीण भागातील तीस ते चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांना रामराम ठोकला आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी संख्या कमी होण्याची चिंता महाविद्यालयांना लागली आहे.

अकरावी प्रवेशाला जागा रिक्त राहत असल्याने यावर्षीपासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतून औरंगाबादला वगळण्यात आले आहे. ऑफलाईन पध्दतीने प्रवेशप्रकिया राबविण्यात आली आहे. मात्र असे असूनही शहरातील महाविद्यालयात अकरावी प्रवेशाला पाहिजे तेव्हढा प्रतिसाद मिळालेला नाही. शहरात क्लासेसची सुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी क्लासेसला आणि शहरातील महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतात.

परंतु कोरोनामुळे क्लासेस बंद आहेत. त्यातल्या त्यात शहरातील काही विद्यार्थी देखील ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेत आहे. त्याचेच अनुकरण ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शहरातील महाविद्यालयात जवळपास तीस ते चाळीस टक्के विद्यार्थीसंख्या अकरावीला कमी झाली आहे. याशिवाय काही शाळांनी फी न भरल्याने विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवून ठेवली आहे. त्याचा देखील परिणाम प्रवेशावर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या