विद्यापीठाची गोंधळाची मालिका सुरूच

pune univercity student

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पेपर फूटी, पेपर मधील तांत्रिक चुका, पेपर न तपासणी अश्या प्रकारचा सावळा गोंधळ सुरू असतांनाच पुनर्मुल्याकनतिल नवीन गोंधळ उघडकीस आला आहे. त्यामुळे हे विद्यापीठ आहे की गोंधळपीठ ? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 अगोदर विद्यापीठ पुनर्मुल्यांकनासाठी जर
विद्यार्थ्याला एकूण गुणांच्या 10 टक्के गुण वाढत असतील तरच वाढीव गुण दिले जात होते .  2016 मध्ये बोर्ड ऑफ कौन्सीलच्या झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना जर 5 टक्के गुण वाढत असतील तर त्यांना वाढीव गुण देण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला.परंतु निर्णय झाल्यानंतरही त्याची अंमलबजाणीच करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच पुनर्मुल्यांकन तसेच अन्य मागण्यांसाठी नाशिक येथील विद्यार्थी न्याय मंचच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांची भेट घेवून अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवदेन सादर केले.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

पुनर्मुल्यांकनामध्ये 10 टक्के गुण वाढत असतील तरच इतर गुण वाढवण्यात येतील हा जो अन्यायकारक नियम आहे तो रद्द करावा.

प्रथम तसेच द्वितीय वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेत किमान 15 व लेखी परिक्षेत किमान 15 गुण मिळत असतील तर तो उत्तीर्ण होईल हा नियम रद्द करून विद्यार्थ्यांना एकत्रीतपणे 40 गुण असतील तर त्यास उत्तीर्ण करण्यात यावे,विद्यार्थी चालु वर्षात सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण असेल आणि मागील वर्षाच्या एका विषयात नापास असल्यामुळे (क्रिटीकल) त्याला पुढील वर्षात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची एका महिन्यातच परीक्षा घेण्यात यावी व इयर ड्रॉप संकल्पना रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.