प्रवेश शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

पुणे : शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गुरुवारी बँकेत शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबळ उडाल्याच दिसून आल . एकीकडे भारत सरकार कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत आहे. तर दूसरीकडे शहरातील नामवंत महाविद्यालयात शैक्षणिक शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तासन तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

नुकतच  १० वी 12 वीचा निकाल लागल्यामुळे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. शहरात विविध महाविद्यालयामध्ये एम कॉम , बीए , बीएससी साठी प्रेवेश सुरू आहेत. मात्र अपुऱ्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जाव लागते आहे . तसेच बँकेत विद्यार्थ्यांच्या अचानक होणाऱ्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर सुद्धा ताण येत आहे. महाविद्यालयात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे .

महाविद्यालयात फी भरण्यासाठी स्वाईप मशीन उपलब्ध करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ कमी होईल. किंवा प्रवेश प्रक्रिये दरम्यान फी भरण्यासाठी पर्याय ठेवावेत. कारण रोख रक्कम कोणी सोबत ठेवत नाही. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सोईनुसार फी भरू शकतील
धीरज सारभुकन , विद्यार्थी