VIDEO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विद्यार्थी आमने-सामने

औरंगाबाद : सध्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून चांगलंच तापल आहे. छत्रपतींच्या पुतळ्याला काही संघटनांनी विरोध दर्शविला आहे तर काही संघटना पुतळा उभारण्याच्या बाजूने उभ्या राहिल्या आहे. महाराष्ट्र देशाने विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे जाणून घेतलं तेव्हा विद्यार्थ्यांना विद्यापीठात पुतळ्यावरून केवळ राजकारण सुरु असल्याचं मत व्यक्त केल.

Loading...

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून मोठा संघर्ष सुरु आहे . राजकीय तसेच विविध संघटनांचा हस्तक्षेप विद्यापीठाच्या कारभारात वाढल्याच चित्र आहे . मात्र विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी शाम पाटील यांनी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली .

विद्यापीठात पुतळा उभारण्याला विद्यार्थ्यांचा फारसा विरोध नसल्याच चर्चेतून समोर आल. त्याचबरोबर विद्यार्थांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विद्यापीठात शिक्षण घ्यावे लागत असून विद्यापीठाच्या वसतिगृहाचा मोठा प्रश्न हाताळण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आल्याचे विद्यार्थांनी सांगितले तसेच कुलगुरू म्हणून डॉ.बी,ए,चोपडे यांच्याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून आली.

पहा विद्यार्थ्यांमध्ये रंगलेली वादळी चर्चा 

https://www.youtube.com/watch?v=Wfw8XM0JEk0&t=131sLoading…


Loading…

Loading...