मंत्रालयाबाहेर विद्यार्थाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन दिली होती मात्र जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या एका २५ वर्षीय विद्यार्थाने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

अहमदनगरचा अविनाश शेटे या विद्यार्थाने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर अविनाशनं कंटाळून आज (बुधवार) मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून पोलिसांनी अविनाशला वेळीच ताब्यात घेतल्यामुळे त्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र या प्रकरणावरून मंत्रालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.