fbpx

तुषारला न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

सोलापूर-  राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार सुनील चव्हाण ( वय – १८ ) याचा दि. 2८ एप्रिल रोजी वडाळा येथे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यास न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. १ मे २०१८ रोजी लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे महाविद्यालय बंद आंदोलन केले.

अपघाताच्या वेळी तुषार ला ताबडतोब मदत न मिळाल्याने तुषारचा मृत्यू झाला. तसेच महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाने देखील तुषार यास दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी महाविद्यालयाची गाडी देण्यासाठी नकार दिला. तसेच घटना घडली यावेळी  काॅलेजचा एकही शिक्षक काॅलेज मध्ये उपस्थित नव्हता.

यावेळी विद्यार्थ्यांनी तुषारच्या मृत्यूसाठी जबाबदार व्यक्तीच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच काॅलेजमध्ये  प्राथमिक वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील या वेळी विद्यार्थ्यांनी केली.या वेळी काॅलेज प्रशासनास विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व मागण्या साठी एक निवेदन दिले. या आंदोलनाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या खूप मोठ्या रोषास काॅलेज प्रशासनास सामोरे जावे लागले.

काॅलेजच्या मेसमध्ये जेवण चांगले नसल्याने तुषार त्या दिवशी जेवण करण्यासाठी बाहेर गेला. जेवण करुन परत येताना मेसमधील एका कर्मचा-यानेच त्याला दुचाकीने उडवले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

1 Comment

Click here to post a comment