शाब्बास रे पठ्ठ्या ! पक्ष सोडणार नसल्याचे शरद पवारांना दिले ‘बॉन्ड’वर लिहून

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कधीही झाली नव्हती इतकी वाताहत पक्षाची यावेळेस झाली आहे. अनेक माजी मंत्री, दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

असं असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी दादाराव कांबळे याने शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर शरद पवार यांना शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी सोबतच राहणार, कधीच पक्ष सोडणार नाही, हे लेखी लिहून दिले. विद्यार्थ्यांचे हे आपल्या प्रती असलेले प्रेम पाहून शरद पवारांनी त्याचे कौतुक केले.

Loading...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी शरद पवारांना भेटण्याची तीव्र इच्छा पूर्ण करण्याचा आग्रह धरला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. उल्हास उढाण यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या भावना सांगितल्या. त्यानंतर पवारांनी परवानगी देत हॉटेलच्या मीटिंग हॉलमध्ये विद्यार्थ्यांना भेटण्याची व्यवस्था करण्याची सूचना संबंधितांना केली.

‘मी काय म्हातारा झालो का?’ अशा शब्दांत कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून शरद पवारांनी तरुणाईला घातलेली साद सगळ्यांनाच भावली आणि ‘साहेब, आम्ही तुमच्या सोबतच आहोत,’ अशी ग्वाही मराठवाड्यातील युवकांनी पवारांना दिली. शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडल्यानंतर ते मुक्कामी राहिले होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी शेकडो विद्यार्थी कार्यकर्त्यांनी हॉटेलात गर्दी केली होती.

या विद्यार्थ्याने या शपथ पत्रात नमूद केले की, “मी एक संशोधक विद्यार्थी व आपला कार्यकर्ता आहे, आपल्या विचारांची बांधिलकी जोपासणारा, आपल्या पक्षाची भूमिका अगदी चहाच्या टपरीपासून विद्यापीठातील मेसवर येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर माझ्या बोली भाषेतून मांडत असतो. आपल्या सामाजिक आणि वैचारिक विचाराने झपाटलेला मी सामान्य घरातील विद्यार्थी आहे.”

‘सध्याच्या काळात पक्षाची होत असलेली वाताहत पाहून माझे मन खिन्न झाले आहे. साहेब कोणी नेते, मंत्री कुठेही गेले असले, तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पुरोगामी विचारांचा वसा सांभाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन आणि उभ्या आयुष्यात कधीच पक्ष सोडणार नाही, असा मनोदय त्याने यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?