fbpx

डोंबिवलीत ११ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

डोंबिवली : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने एका ११ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीमधील गोपाळ नगर भागात ही घटना घडली आहे. या विद्यार्थिनीला हिंदी विषयात कमी गुण मिळाले होते. यामुळे शिक्षिकेने त्या विद्यार्थिनीला फटकारले होते. शिक्षिकेने विद्यार्थिनीला मुख्याध्यापिकांसमोर हजर केले होते. मुख्याध्यापिकांनी त्या मुलीला पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते. मात्र, भीतीने त्या मुलीने कोणालाही याबाबत काहीही सांगितले नाही. या सर्व प्रकारामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.