गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

पुणे:- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती मूक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये अनेक महाविद्यालयांसह विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

गुडलक चौकापासून सुरु झालेल्या या मोर्चाची सांगता महर्षी विठ्ठल रामजी पुलावर निषेधाची सभा घेऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राकेश कामठे आदींनी सभेत सहभाग नोंदवला.पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.हजारो तरुण तरुणी या मोर्च्या मधे सहभागी झाले होते.