fbpx

‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चा ट्रेलर यूट्यूबवर हिट !

टीम महाराष्ट्र देशा : पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आहे.  केवळ २४ तासांच्या आतचं या ट्रेलरला यूट्यूबवर १६ मिलियन व्हीव्झ मिळाले. सध्या यूट्यूबवर हा ट्रेलर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

या चित्रपटात टायगर श्रॉफ सह अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महाविद्यालयाचा स्टुडंट ऑफ द इअर होण्यासाठी टायगर श्रॉफचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. तसेच टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्यामध्ये लव्ह ट्रॅंगल दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होत आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. याच चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुमारे ७५ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. आता सीक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा पुनीत मल्होत्रावर आहे. पुनीतने याआधी ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘गोरी तेरे प्यार मैं’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.