गरिबांसाठीच्या सरकारी योजना ‘जाचक’ अटींच्या कचाट्यात

अक्षय पोकळे: गेल्या काही वर्षापासून सरकारने नागरिकांसाठी जाहीर केलेल्या योजनांच्या नियम आणि अटीमुळे नागरीकांना कोणतीही योजना घेण्यासाठी अडचणींचा समान करावा लागला नसेल तर नवलच. हेच चित्र डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेमध्ये पहायला मिळत आहे. हि योजना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सुरु झाली. या योजनेमधे ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा बाहेर गावी राहणाऱ्या गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत स्मार्टसिटी मधे राहणाऱ्यांसाठी प्रति महीना 3000 रुपये व इतर शहरांमधे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति महीना 2000 रुपये ची तरतूद आहे.

पण अजूनही मागील वर्षी या योजनेत पात्र झालेल्या विद्यार्थ्याची रक्कम अजूनपर्यंत खात्यात जमा झालेली नाही. दुसरीकडे सध्याची परिस्थिती पाहता सरकारच्या जाचक अटीमुळे अनेक गरजु विद्यार्थी या योजनेतून बाजूला राहत आहेत. त्यामुळे भत्ता रक्कम लवकरात लवकर खात्यात वर्ग करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

या बाबत बोलताना विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र देशाकडे आपल्या व्यथा मांडल्या “कॉलेजच्या हॉस्टेलला आधीच जागा कमी असतात. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला बाहेर खासगी रूम करून रहाव लागत. त्यामुळे आम्हाला या योजनेचा काहीच फायदा होत नाही. फॉर्म भरत असताना फक्त हॉस्टेलमधे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हि योजना लागू असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना समोर जाव लागत असल्याच इंजिनीअरिंग विद्यार्थी असणाऱ्या आकाश काळे याने सांगिलत आहे.

योजना चांगली आहे पण याचा फायदा आम्हाला होत नाही. मागील वर्षी अर्जदाखल केले आहेत तरी अजुन त्यांचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत.ही रक्कम लवकर मिळावी अशी विनंती शुभम काकडे या विद्यार्थाने केली