मराठा आरक्षण रद्द झाल्याने औरंगाबाद पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी परीक्षेवाचून वंचित?

मराठा आरक्षण रद्द झाल्याने औरंगाबाद पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी परीक्षेवाचून वंचित?

Aurangabad police recruitment

औरंगाबाद : राज्यातील आरोग्य भरतीमध्ये झालेला गोंधळ ताजा असताना आता पोलीस दलामध्ये होणाऱ्या भरती परीक्षेतही गोंधळ समोर आला आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या भरती परीक्षेला आता विद्यार्थी वंचित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने या कॅटेगिरीमध्ये फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला आहे.

औरंगाबाद पोलीस दलात भरती होण्यासाठी अनेक तरुण तयारी करत आहेत. त्यातच २०१९ मध्ये जागा निघाल्या होत्या. त्यावेळी मराठा आरक्षणाचा निर्णय झालेला असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तसे फॉर्म भरले होते. मात्र, कोरोना काळामुळे परीक्षा लाबणीवर पडली आणि विद्यार्थी देखील परीक्षेची प्रतिक्षा करू लागले. मात्र, दरम्यानच्या काळात न्यायालयाने मराठा आरक्षणच रद्द ठरवले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता.

त्या वेळी अशा विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या मागास गटातून आपल्या अर्जात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्ममध्ये ऑनलाईन बदलही केला. मात्र, आता या प्रवर्गाच्या जागाच उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार असल्याची भीती या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या