परिस्थीतीमुळे शिक्षण पुर्ण करता येत नसल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

Sucide

नांदेड : घरातील हलाखीची परिस्थीती असल्याने आपले शिक्षण पुर्ण करता येणार नाही. याची जाणीव झाल्याने धर्माबाद तालुक्यातील एका विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास लावुन घेत अत्महत्या केली. अभ्यासू विद्यार्थीनीने या उचललेल्या पावलामुळे संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धर्माबाद तालुक्यातील शंकरगंज भागातील साक्षी रमेश कुंटुरवार ही विद्यार्थीनी किरायाच्या घरात राहत होती. मुखेड तालुक्यातील शाहीर अण्णाभाऊ साठे कनिष्ठ महाविद्यालयात साक्षी शिक्षण घेत होती. वडिलांची परिस्थिती गरीबीची असल्याने आपले शिक्षण पुर्ण होणार नाही अशी कल्पना साक्षी ला होती. गरीब परिस्थीतीमुळे तिचे आई वडील हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते.

याच विंवचणेतुन शुक्रवारी आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. अभ्यासू विद्यार्थीनी म्हणुन ती जिल्ह्यात प्रसिद्ध होती. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने आपले शिक्षण पुर्ण होणार नाही हे तिला उमजले आणि यातुनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. सुधाकर कुंटुरवार यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या