विद्यार्थी रंगले शेकोटी काव्य संध्येत

औरंगाबाद : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने शेकोटी काव्य स्पर्धा’ आयोजित केली होती. अतिशय उत्साहात आणि काव्यमयपणे रंगली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘वाय कॉर्नर’ परिसरात ‘शेकोटी काव्य संध्या’ या काव्यमैफिलींचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

सामाजिक, प्रेम, शायरी च्या माध्यमातून उपस्थित कवींनी रंगतदार मैफिलीत बहार आणली. युवा कवी नारायण लांडगे यांनी फुले, शाहू, आंबेडकर यावर कविता सादर करून आजच्या परिस्थितीवर विद्रोही ताशेरे ओढले. दरम्यान युवा कवी प्रतीक कुकडे यांनी टाळेबंदी व नाना तर्हेचे माणसे या सामाजिक जीवनावर आधारित कवितांनी मैफिलीचे वातावरण गंभीरच करून टाकले. भारत चव्हाण यांनी प्रेमाच्या कविता सादर करून मैफिल प्रेममय केली. डॉ. दिपक बहिर यांनी स्त्री-समानतेवर कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली.

यासह राजेश्वर खुडे, भिमराव मोटे, शालिनी कदम, समाधान दहिवाळ, दैवत सावंत, योगेश कदम, दिनेश सुरडकर यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम, शुभम जटाळ मयुर सोनवने, मधुकर सावंत, आकाश हिवराळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी सादिक शेख, डॉ. अमोल धांद्रे, अमित कुटे,अमोल दांडगे, दिक्षा पवार, शरद शिंदे, गणेश शिंदे, शैलेश जाधव, अजय पवार, रवि माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिपक बहिर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास ठाले व आभार प्रदर्शन प्रशांत कदम यांनी केले.

महत्वाच्या बातम्या