जेष्ठ नागरिकाला धक्का लागल्याने तरुणाला अमानुष मारहाण

पुण्यातील जंगली महाराज रोडवर टोळक्याचा राडा

पुणे : जंगली महाराज मंदिरासमोर असणाऱ्या खाऊ गल्लीत शुल्लक कारणावरून एका तरुणाला टोळक्याने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित तरुण हा खाण्यासाठी आला असता गाडी पार्ककरत असताना त्याच्या धक्का जेष्ठ नागरिकाला लागला. यावेळी तरुणाने त्यांची माफीही मागितली मात्र जवळच उभारलेल्या स्थानिक तरुणांनी संबंधित तरुणांला जबर मारहाण करत केली.

हि घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जंगली महाराज मंदिरासमोर घडली आहे. संबंधित तरुण हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते. तरुणाला मारहाण केल्यानंतर टोळक्याने बाजूला उभा असणाऱ्या खाऊच्या गाड्या आणि दुचाकीची नासधूस  केली आहे.

दरम्यान या ठिकाणी अनेक अनधिकृत खाऊच्या गाड्या उभा असतात. येथे खायला येणाऱ्यामुळे कायम वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळत. मात्र वाहतूक विभाग आणि महापालिकाही काहीच कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे.