‘स्पेस फॉर डेमोक्रेसी’ साठी विद्यापीठात विद्यार्थी संघटना एकवटल्या

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वेगवेगळ्या पाच ते सहा विद्यार्थी संघटनांकडून ‘स्पेस फॉर डेमोक्रेसी’ साठी आंदोलन करण्यात आले. विद्यापीठकडून हुकूमशाही प्रकारे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. यावेळी विद्यार्थांनी विद्यापीठ प्रशासन मुर्दाबादचे नारे देऊन निषेध व्यक्त केला.

bagdure

विद्यापीठ परिसरात विद्यार्थी संघटना गेली कित्येक वर्षे अनिकेत कँटीन समोर आंदोलन करतात. वेगवेगळे पोस्टर लावून निदर्शने करतात मात्र विद्यापीठाने यावर बंदी घातली असून अनिकेत कँटीन परिसरात विद्यार्थी संघटनांना आंदोलन करता येणार नसल्याचे बजावले आहे. विद्यापीठाने एका महिन्यापूर्वी एक पत्रक काढून अनिकेत कँटीन परिसरात रिफ्रेक्टरी कँटीन, जयकर लायब्ररी आहे. त्यामुळे याठिकाणी आंदोलन केल्यास इतर विद्यार्थ्यांना त्रास होतो. तसेच यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन चे विद्यार्थी आमने-सामने आले होते. त्यामुळे अनिकेत कँटीन परिसरात आंदोलन करण्यास बंदी घातल्याचे स्पष्ट केले होते.

विद्यापीठात आज एन.एस.यु.आय, एस.एफ.आय, मुक्तीवादी, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, भारतीय विद्यार्थी मोर्चा, डापासा या संघटनांनी एकत्र येवून विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केली. यावेळी एस.एफ.आय चे सतीश देबडे म्हणाले, विद्यापीठाने हा निर्णय माघे घेतला नाही तर हे आंदोलन आमच पहिल पाऊल आहे. निर्णय रद्द करण्यात न आल्यास या पेक्षा अधिक तीव्र व अधिक ताकदीने सर्व विद्यार्थी संघटना पुन्हा एकदा आंदोलन करतील.

You might also like
Comments
Loading...