राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने कांदा निर्यात बंदीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

ठाणे : कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी यासाठी केलेल्या आंदोलनात घोषणात मात्र कांद्याची निर्यात बंद करा अशी घोषणा स्वतः ठाणे शहर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलन नक्की कशासाठी आहे याची काहिच कल्पना कार्यकर्त्यांना नसल्याचे सत्य उघड झाले. बराच वेळ चाललेल्या या घोषणाबाजीत गडबड असल्याची बाब, प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यावर यात दुरुस्ती करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून त्यामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ नये यासाठी हे बंदी त्वरित रद्द करावी अशी मागणी ठाणे शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुजाता घाग यांनी केली.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :