Sandhya Sawalakhe । मुंबई : मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट करत टोला लगावला आहे. यानंतर आता काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
संध्या सव्वालाखे म्हणाल्या, चित्राताईना काहीच कसे वाटत नाही? तुम्हाला मी दंडवत करते तुम्ही एकसूत्री कार्यक्रम राबवत आहात. तुमच्या पक्षात काय चालू आहे यावर तुमचे लक्ष नाही. काँग्रेसमध्ये घाण नाही, घाण तुमच्या पक्षात आहे. आताचे अलिकडचे श्रीकांत देशमुख प्रकरण ताजे आहे. त्यावर तुम्ही काही बोलत नाही आहात? असा सवाल करतानाच लोकांची घरे बरबाद करण्याचा कार्यक्रम बंद करा, असा इशारा त्यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करत नाना पटोले यांना, ‘काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं’ असा प्रश्न विचारला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर एक पत्रकार परिषद देखील घेतली. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी याबाबत समोर येऊन भूमिका मांडावी असे चित्रा वाघ म्हणाल्या.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी केला आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thakrey : “सह्याद्री वाहिनीवर होणारा इतर भाषेचा प्रादुर्भाव…”, राज ठाकरेंचे दूरदर्शनला पत्र
- Atul Bhatkhalkar : “साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला…”, अतुल भातखळकरांनी NCP ला डिवचले
- Uddhav Thackeray : “मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात…”, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- Eknath Shinde : “पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढा”, मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ‘त्या’ प्रकरणी नऊ दिवसांची ईडी कोठडी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<