कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास एक मजबूत पर्याय – शरद पवार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ कॉंग्रेससोबतच आघाडी करणार आहोत. जर आम्ही एकत्र निवडणूक लढलो तर एक मजबूत पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधकांनी आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत पवार यांच्यासह देशभरातील अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते.

शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. जर शिवसेनेने शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिली, तर त्यांच्यासाठी फायद्याचे आहे. त्यांच्याकडे समर्पित उमेदवार आहेत व युती असतानाही त्यांना मित्र पक्ष भाजपकडून चांगली वागणूक मिळत नाही. स्वबळावर लढल्यात शिवसेनेला ताकद मिळेल, असेही पवार म्हणाले.