‘एफटीआयआय’चे विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे – एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांची आंदोलने सुरुच आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. या वादातून ५ विद्यार्थ्यांना काढण्यात आले आहे. तर या विद्यार्थ्यांना ३ दिवसांच्या आत होस्टेल सोडून जाण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

एफटीआयआयच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या ५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर या वर्गातील इतर ४७ विद्यार्थी आता आंदोलनाच्या पवित्र्यात असुन त्यांनी एफटीआयआयच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्या वर्षाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दहा मिनिटांची लघुपट तयार करायची असते. त्यासाठी त्यांना ३ दिवसांचा वेळ दिला जातो. मात्र, यावेळी या विद्यार्थांना दोनच दिवस वेळ देण्याचा निर्णय एफटीआयआय च्या प्रशासनाने घेतला. विद्यार्थ्यांनी या गोष्टीला विरोध करत फिल्मसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला पहिल्या गटातील ५ विद्यार्थी ९ तारखेला गैरहजर राहीले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बोलावण्यात आलेल्या बैठकीला विद्यार्थ्यांचा दुसरा गटही गैरहजर राहीला. त्यामुळे एफटीआयआय प्रशासनाने पहिल्या गटातील ५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकले. आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनवर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावली. या प्रकरणानंतर मात्र सर्व ४७ विद्यार्थ्यांनी लघुपट निर्मितीसाठी दोन दिवसांची मुदत मान्य न करण्याचा निर्णय घेतलाय.

Comments
Loading...