fbpx

देशव्यापी संपावरुन टीएमसी-सीपीएम कार्यकर्ते  भिडले

 मुंबई : केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्यातील रिझर्व्ह बँकेतील कर्मचाऱ्यांसह पोस्ट, बीएसएनएल कर्मचा-यांनी उडी घेतली आहे. याशिवाय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेनेही संपात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना या संपाचा मोठा फटका बसणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपावरुन टीएमसी आणि सीपीएम कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचे समजते. दरम्यान, सरकारकडून कामगारविरोधी धोरणं राबवली जात असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय. या संपामध्ये देशभरातील 20 कोटी कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा विविध संघटनांनी एकत्र येत केलाय.

भाजप सरकार कामगारविरोधी असून या संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन संघटनांनी केलंय. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारही यात सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांनी केलाय. दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, कोळसा खाण, रुग्णालय, वीज, बँक, विमा आणि परिवहन क्षेत्रातील कामगार यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. संसदेवर मोर्चाही काढला जाणार आहे.