दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, वेतन निश्चिती, विविध भत्ते व सेवा सवलती मिळाव्यात यासाठी ऐन दिवाळीत संपावर जाणार आहेत.

येत्या १७ ऑक्टोबरपासून हे कर्मचारी संपवर जाणार आहेत. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) पाठिंबा दिला आहे.

संघटनेने घेतलेल्या मतदानात कामगारांनी संपाला कौल दिला आहे. हा संप १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजतापासून केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली