धक्कादायक! वाळू माफियांकडून तहसीलदारावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर : राहुरी तालूक्यातील शेरी चिखलठाण येथील मुळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरु असताना छापा टाकण्यास गेलेल्या तहसिलच्या पथकावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या हल्ल्यात तहसीलदारांसह ३ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राहुरी तालूक्यातील शेरी चिखलठाण येथील मुळा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर, छापा टाकण्यास गेलेल्या तहसिलच्या पथकावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी वाळू माफियांकडून पथकावर दगडफेक देखील करण्यात आली. याबाबत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून, १० वाळू तस्करांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ११ ब्रास वाळूसह ३ ट्रॅक्टर, २ जेसीबी, २ डंपर असा ९८ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याचं तक्रारीत म्हंटलं आहे.

You might also like
Comments
Loading...