गणेशोत्सव मंडळांसाठी कडक नियमावली! गणेशभक्तांना मंडपात प्रवेश बंदीच

ganpati

मुंबई: कोरोनाचे सावट हे गणेशोत्सवावर अधिक गडद होत असून यंदा अत्यंत साधेपणाने व आरोग्यदायी उत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन केले जात आहे. साधारण बाप्पा येण्याआधी २ महिने असतानाच गणेशभक्तांकडून व मंडळांकडून तयारी सुरु केली जाते. मात्र, यंदा असलेल्या महामरीमुळे अनेक विघ्न उत्सवांवर असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील नियमावली ठरवली आहे.

भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. तसेच हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन या कार्यक्रमांना केवळ 10 कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहता येणार आहे. मुंबईत साधारणत: साडेबारा हजार गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव पूर्णत्वास नेणे ही तारेवरची कसरत असणार आहे.

कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात गर्दी झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढणार आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा मात्र, कोरोना या रोगाचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण राज्यातच जल्लोष शांत असणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : लॉकडाऊनमध्ये खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार

गणेशोत्सव मंडळांसाठी नियम-

१)मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.

२)मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून ३ वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे.

३)मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.

४)आरतीला मंडपात जास्तीत जास्त १० कार्यकर्त्यांना प्रवेश असेल. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ १० कार्यकर्ते सहभागी होऊ शकतील.

५)मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावेत. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.

६)भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.

७)कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.

८)ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे.

बारामती शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – अजित पवार