मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक काल(२८ नोव्हें.) बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackray) यांनी सर्व यंत्रणांना सतर्क होण्याचे आदेश दिले आहेत.
बैठकीदरम्यान ठाकरेंनी सांगितले की,’कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा. लॉकडाउन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील.’ तसेच विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.
तसेच पुढे ते म्हणाले की,’कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. ‘कुछ नही होता यार’ असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो. त्यामुळे मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच. आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे’, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल