विठुरायाच्या पंढरीत कडक संचारबंदी लागू, बाहेरून येणाऱ्याला प्रवेश नाही

विठुरायाच्या पंढरीत कडक संचारबंदी लागू, बाहेरून येणाऱ्याला प्रवेश नाही

pandharpur

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून पंढरपूरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे प्रतीकात्मक पद्धतीने हा सोहळा साजरा होणार आहे दहा मानाच्या पालख्यामधील वारकऱ्यांना व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला पंढरपूर शहरामध्ये प्रवेश असणार नाही. आज सकाळी संचारबंदी सुरू झाल्यापासून पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकॅडींग टाकून बंद करण्यात आलेले आहेत.

दुसरीकडे देहू, आळंदी सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पालखी मार्गावर एक दिवसाची जमावबंदी असणार आहे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका 19 जुलैला एसटीने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. यावेळी भाविक दर्शनासाठी देहू, आळंदी सह पालखी मार्गावर गर्दी करण्याची शक्यता आहे.

खबरदारी उपाय म्हणून त्या दिवशी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने,डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी,ऍम्ब्युलन्स सेवा याना ह्या जमावबंदी मधून वगळण्यात आले आहे. तसेच देहूगाव, आळंदी मधील स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळणार आहे.

दरम्यान, आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपुरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या