शाळेत शिकवत असताना खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : ही बातमी आहे राज्यातील ‘त्या’ शिक्षकांसाठी जे शाळेत शिकवत असताना सुद्धा खासगी शिकवणीने आपले घर भरवत असतात. आता शाळेत शिकवत असतानाच खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना वठणीवर आणण्यासाठी शिक्षण विभागाने पाऊलं उचलली आहेत.
सर्व मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून खासगी शिकवणी घेणार नसल्याचे हमीपत्रच भरून घेण्याचे आदेश गुरुवारी शिक्षण विभागाने जारी केले आहेत. शिवाय हमीपत्र दिल्यानंतरही खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देखील दिले आहेत.