वाचा त्रिपुराच्या ‘सुपर मॅन’ची कहाणी ज्याने वाचवले हजारो प्रवाशांचे प्राण

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या देशाला धाडसाचा आणि माणुसकीचा मोठा इतिहास आहे. अनेक वीर या देशात जन्मले आहेत. जीवाची परवा न करता देशासाठी समाजासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे समाज हिताच्या भावनेने झपाटलेल्या आपल्या भारत देशात खऱ्या ‘सुपर मॅन’ची कमी नाही. असाच एक ‘सुपर मॅन’ आहे त्रिपुरातील आदिवासी स्वपन देबबर्मा. आता या स्वपनने नेमक काय केलंय याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच.

घटना आहे १५ जूनची, त्याच झाल असं की त्या दिवशी घरात तांदूळ नव्हते. बाहेर जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे त्रिपुराच्या धलाई येथे राहणारे स्वपन देबबर्मा आणि त्यांची मुलगी सोमती मासे पकडण्यासाठी घराबाहेर पडले. जेव्हा ते रेल्वे रुळाजवळ पोहोचले तेव्हा ट्रॅकखालची माती सरकली असल्याचं त्यांना दिसलं. स्वपनला लगेच कळाल जर ट्रेन थांबवली नाही तर हजारो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागेल. त्यामुळे स्वपन आणि सोमती दोन तास ट्रॅकवर बसूनच राहीले. जस स्वपनने ट्रेन येत आहे हे पहिले तेव्हा तो लगेचच शर्ट काढून त्यांना इशारा देऊ लागला. पण ट्रेन थांबत नसल्याचं पाहून जीवाची परवा न करता तो थेट रुळावर जाऊन उभा राहिला. हे करत असताना त्याने आपल्या मुलीलाही ओढून घेतलं. स्वपन सांगतो “हजारो लोकांसाठी दोन जीव गेले तरी चालतील असा विचार आम्ही केला”. मोटरमनने या दोघांना ट्रॅकवर उभं राहिलेलं पाहून ट्रेन थांबवली आणि मोठा अपघात टळला.

या घटनेनंतर स्वपन देबबर्मा आणि त्यांची मुलगी सोमती याचं खूप कौतुक होत आहे. या घटनेशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वपन हिरो झाला आहे. मात्र खऱ्या हिरोंच्या आपल्या देशात संघर्ष देखील तेवढाच आहे. ‘जनधन’ चा गाजावाजा होत असताना चौथीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडणारे स्वपन बँकेत खाते उघडण्यासाठी कागदपत्रे गोळा करत आहे. मात्र अजूनतरी सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत ते खातं उघडू शकले नव्हते.

स्वपन सांगतात, त्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड नाही आहे. “मी खूप प्रयत्न केला पण बँक खातं उघडू शकलो नाही. मी जंगलातून लाकूड नेऊन स्थानिक बाजारात विकतो. दिवसाला ६० ते ७० रुपयांची कमाई होते”. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून स्वपन देबबर्मा एक हिरो झाले आहेत.

देशाच्या या खऱ्या हिरोला ‘महाराष्ट्र देशा’चा मानाचा मुजरा

पहा त्रिपुराच्या ‘सुपर मॅन’ची कहाणी