अतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे

जव्हार – कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ऊपकेंद्र आणि पथकांना व जव्हार कुटीर रूग्णालयाला आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली आहे. आरोग्य मंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी तातडीने हा दौरा केला आहे. अतिदुर्गम भागात खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ऊपकेंद्र आणि पथक यांचे बळकटीकरण करून त्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी जव्हार येथे दिले आहे.

अतिदुर्गम भागातील रूग्णांना खऱ्या अर्थाने सेवा देणारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ऊपकेंद्र आणि पथक या यंत्रणा आहेत. मात्र, येथे वैद्यकीय अधिकारी आणि संदर्भ सेवा देण्यासाठी रुग्णवाहीका यांची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या यंत्रणांचे बळकटीकरण करण्यासाठी आपण तातडीने कार्यवाही करणार असल्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी जव्हार येथे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Loading...

राज्यात 15 वैद्यकीय अधिकार्यांचे पदे रिक्त आहेत. ते तातडीने भरण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांनी पालघर जिल्हयातील कुपोषणाला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने तुटपुंज्या मानधनात काम आशा वर्कर यांचा शासनाच्या वतीने गौरव करणार असून त्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे सांगितले आहे.

आरोग्य मंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथम तातडीने जव्हार मधिल अतिदुर्गम जामसर, दाभेरी, साखरशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ऊपकेंद्र आणि पथकांना प्रत्यक्ष भेटी देऊन जव्हार कुटीर रूग्णालयाची ही पाहणी केली आहे. जिल्ह्यातील एकमेव जव्हार कुटीर रुग्णालयातील सरकारी रक्त पेढी , जवजात शिशु अतिदक्षता कक्षांची त्यांनी पाहणी केली आहे. रूग्णांची आस्थेवाईक चौकशी करून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

पालघर मधील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यातील रुग्णांचा भार केवळ 100 खाटांचे जव्हार कुटीर रूग्णालय असतांना , ऊत्तम रूग्णसेवा देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे येथे 200 खाटांच्या रुग्णालयाला मान्यता देऊन, त्यासाठी नव्याने ईमारत बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून जव्हार येथे वैद्यकीय महाविध्यालय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा