अजब निर्णय! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड होणार बंद

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतातील आतापर्यंत जवळपास 24 कोटी डोस देण्यात आले आहेत. पण काही देशांमध्ये लसीबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण झालेत. त्यामुळे तेथील सरकारला विविध प्रलोभणे किंवा शिक्षेची भीती दाखवून लस घेण्यासाठी आग्रह करण्यात येतोय. आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तानात अशीच काहीशी परिस्थिती आहे. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सरकारनं लस न घेणाऱ्या नागरिकांचं सिम कार्डच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अजब निर्णयाची जगभरात चर्चा होऊ लागलीये.

पंजाब राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. यासमीन रशीद यांनी याबाबतचा निर्णय घेतलाय. पंजाब प्राथमिक आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून असं दिसतं, की राज्य अजूनही लसीकरणाचं निर्धारित लक्ष्य गाठण्यात मागे आहे. राज्यात तीन लाख लोक असे आहेत, जे १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी परतलेच नाहीत. यामुळे, राज्य सरकारनं हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगण्यात आलेय.

याआधी पाकिस्तानच्या सिंध राज्य सरकारनंही असाच विचित्र निर्णय घेतला होता. जे सरकारी कर्मचारी कोरोना लस घेणार नाहीत, त्यांचा पगार दिला जाणार नाही असा फतवा काढण्यात आला होता. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ९५ लाखाहून अधिक लसीचे डोस देण्यात आलेत. पण दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या केवळ २५ लाख आहे. देशातील एकूण २१ कोटी लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP