एक जादुगार मुख्यमंत्री बनतो तेव्हा..!

टीम महाराष्ट्र देशा : एक विशीतला तरुण महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होवून सामाजिक कामात सक्रीय झाला. १९७१ सालच्या बांगलादेश युद्धातील निर्वासितांच्या शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम करू लागला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी या शिबिराला भेट दिली. त्या तरुणाची उर्जा पाहून, त्याला कॉंग्रेस जॉईन करायला सांगितले. तो तरुण कॉंग्रेसमध्ये सक्रीय झाला. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी विधानसभा निवडणुकीला समोरा गेला. प्रचाराला चक्क स्वताची दुचाकी विकली. पण १९७७ ची ही निवडणूक हरला. पण हिम्मत हरला नाही, ८० साली लोकसभा लढला आणि दिल्लीत गेला, आणि वयाच्या ३१ व्या केंद्रीय मंत्री झाला. ही गोष्ट आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची.

पहा कसे झाले अशोक गेहलोत जादुगार ते मुख्यमंत्री….