‘देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते’

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक वेळा गोटे यांनी भाजपवर देखील तसेच भाजप नेत्यांवर देखील टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शिरपूर येथील एका सभेत ते बोलत होते. यावेळी बोलत असताना गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

याबाबत बोलताना गोटे म्हणाले की, ‘या जगाच्या पाठीवर देवेंद्र फडणवीस यांच्या इतका लबाड आणि खोटारडा माणूस सापडणार नाही, फडणवीस हे कोणाशीच खरे बोलत नाहीत, असे म्हणत गोटे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ‘मी एकदा त्यांना पत्र लिहिले, देवेंद्रजी तुम्ही एक तरी दिवस खरे बोललेले सांगा. म्हणजे तो मला तो दिवस साजरा करता येईल. अमृता वहिनींना तरी ते खरे बोलतात का हे विचारावे लागेल, असे गोटे म्हणाले.