हाताचे एकही बोट हालत नसताना, त्याने चंग बांधला एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक जोडण्याचा

विरेश आंधळकर: २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रात सत्तांतर होवून भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला. कॉंग्रेससह अन्य विरोधकांचा सुपडा साफ झाला. भाजपच्या विजयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट तर होतीच, मात्र दुसरीकडे आजवर राजकारण्यांनी दुर्लक्षित केलेला सोशल मिडिया देखील मोठा फॅक्टर ठरला. यानंतर आता राजकीय पक्षांनी कॉर्पोरेट कंपन्यांना कोट्यावधींचे पॅकेज देत प्रभावी सोशल मिडिया वापरला सुरुवात केली आहे. मात्र शेवटी पैसे घेवून यंत्रणा राबवणारे लोक पक्षाला किती प्रमाणात लोकांमध्ये घेवून जाणार हाही प्रश्न राहतोच. मात्र वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारा एक कार्यकर्ता स्वयंम स्फूर्तीने जर आपल्या पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फेसबुक सारख्या सर्वात मोठ्या सोशल मिडीयाचा वापर करत असेल तर गोष्टच वेगळी असेल. याच प्रत्यक्षात उदाहरण सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पहायला मिळत आहे. ते सुदर्शन जगदाळे या युवकाच्या रूपानेसुदर्शन जगदाळे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील शिरूरमधला, आपली दहाही बोटे काम करत नसताना देखील या पठ्याने ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ नावाने फेसबुकवर ग्रुप काढत राष्ट्रवादीच्या लाखो कार्यकर्त्यांना एका छत्राखाली आणण्याच काम केलं आहे. मुख्यतःहा सध्या सर्वच पक्षाचे नेते आपल्या फेसबुक अकाउंट अथवा पेजवरून सर्वांशी संवाद साधत असतात. मात्र हे एकाच बाजूने होत असल्याच दिसत, मात्र तुमचा फेसबुक ग्रुप असल्यास येथे चर्चेच्या फैरीझडू शकतात. आपल्याला पटणारी धोरणे, पक्षाची कामे याच्यावर चर्चा होवू शकते हेच एकद्या ग्रुपच विशेषत्व असू शकत. हेच काम सध्या सुदर्शन हा करत आहे.

‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ गुपमध्ये सध्या राज्यभरातील राष्ट्रवादीला मानणारे २ लाख ९ हजार कार्यकर्ते एकत्र आले आहेत. यामधील जवळपास दीड ते दोन लाखांच्यावर अॅक्टीव्ह लोक रोज वेगवेगळ्या विषयावर, पोस्टवर लाईक कॉमेंट करत असतात तसेच आपल्या नेत्यांनी काम कस आहे, आणखीन काय करायला हव याचीही चर्चा होते.सुदर्शन जगदाळे यांच्या कामाच कौतुक देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल आहे. तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी सुदर्शनला दिलेली साथ देखील त्याच्या कामाला वाव देणारी आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे राज्यभरातील पदाधिकारी हे या ग्रुपवर थेट ‘लाईव्ह’ सर्वांशी संवाद साधत आहेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...