fbpx

‘त्या’ पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्या- संभाजी भिडे गुरुजी

sambhaji bhide

सांगली: संभाजी भिडे गुरुजी यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना कर्तव्यात कसूर करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच यामध्ये निलंबित केलेल्या पोलिसांचा काहीच दोष नाही असेही भिडे यांनी स्पष्ट केले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक तसेच कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी भिडे गुरुजींच्या संरक्षणासाठी हजर नसणाऱ्या ५ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले होते. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली होती.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर भिडे गुरुजी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. भिडे हे २० एप्रिलला पुण्याला आले होते. मात्र त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे एकही पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे अधिक्षक शर्मा यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पाच जणांचे निलंबन केले आहे.

संभाजी भिडे यांना सांगली शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून संरक्षण देण्यात येते. संबंधित विभागाचे चार पोलीस कर्मचारी रोज भिडे यांच्यासोबत असतात.