‘दसऱ्याला लंकेश्वर राजा रावणाचा पुतळा जाळण्याची प्रथा बंद करा’, बिरसा क्रांती दलाची मागणी

यवतमाळ : विजयादशमीच्या दिवशी भारतभरात रावणाचा पुतळा दहन करण्याची परंपरा सुरू आहे. पुराणानुसार भगवान श्रीरामाने याच दिवशी रावणाचा वध केला होता. त्यामुळे विजयादशमीला प्रतिकात्मक रावण दहन केले जाते. मात्र, या परंपरेला बिरसा क्रांती दलाने आक्षेप घेतला आहे. दसऱ्याला लंकेश्वर राजा रावणाचा पुतळा जाळण्याची प्रथा बंद करा अशी मागणी संघटनेने केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या दशातील आदिवासी समाजाचा खरा आदर्श राजा रावण होता. रावण शिलवान, बलवान, विद्बवान होता. दक्षिणेकडील प्रातांत कर्नाटक, केरळ राज्यात आदर्श रावणाची मंदिरे तो आदिवासी राजा आहे म्हणून आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने दसऱ्याच्या दिवशी पुजा अर्चना करतात. परंतु काही ठिकाणी दसऱ्याला रावण दहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे.

महात्मा रावण हे आदिवासी समाजाचे दैवत आहे. आणि आमच्या दैवताला कोणी जाळत असेल तर आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या विरोधात आदिवासी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा कारण कोणत्याही कायद्यात ‘दहन’ करण्याची प्रथा नाही, त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावनांचा विचार करून आपण अशा विकृती पसरविणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये, असे निवेदन दिग्रसच्या बिरसा क्रांती दल संघटनेने प्रशासनाला दिले आहे.

महत्वाच्या बातम्या