‘घुसखोरी थांबवा अन्यथा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल’, अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

पणजी : पाकिस्तानातून होणारी घुसखोरी थांबली नाही आणि काश्मीरमध्ये अशाच प्रकारे सामान्य नागरिकांवर हल्ले होत राहले तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करायला वेळ लागणार नाही असा इशारा गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला दिला आहे. गोव्याच्या धोरबंदोरा इथल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.

‘आम्ही कोणीही आमच्यावर केलेले हल्ले खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईल करू’ असे अमित शाह म्हणाले.

यावेळी त्यांनी माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचीही आठवण काढली. पंतप्रधान मोदी आणि मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या या त्यातून दिला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती. पण आता ती वेळ राहिली नाहीये. आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

कार्यक्रमात  त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कारभाराचेही वाभाडे काढले. ‘अनेक वर्षांपासून सीमा पार करुन आक्रमणकारी येथे येत होते. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना करत होते, दहशतवादी कारवाया करत होते, आणि दिल्ली दरबारातून निवेदनाशिवाय काहीही होत नव्हते. मात्र जेंव्हा पुंछमध्ये हल्ला झाला आणि आपले जवान मारले गेले. काश्मीरच्या सीमेवर हल्ला झाला आणि आपले जवान मारले गेले. जिवंत जाळण्यात आले, पण त्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करुन भारताने जगाला दाखवून दिलं, की भारताच्या सीमांना छेडणं महागात पडू शकते.’

महत्त्वाच्या बातम्या