‘कोंम्बिग ऑपरेशन’ थांबवा अन्यथा आत्मदहन करणार

औरंगाबाद भारीप जिल्हाअध्यक्षाचा आत्मदहनाचा इशारा

औरंगाबाद : भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मात्र भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निर्दोष नागरिकांची धरपकड बंद करा म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर भारिप औरंगाबाद चे जिल्हाअध्यक्ष अमित भुईगळ यांनी पोलिसांकडून होत असलेली कारवाई दोन दिवसात मागे नाही घेण्यात आली, तर मी आत्मदहन करीन. पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशनच्या नावाखाली निरपराध नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. असा इशारा पत्रकार परिषेदेत दिला आहे.

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या दगडफेकीचे पडसाद संपूर्ण राज्यात दिसून आले. भारिप चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची हक दिली होती. त्या दरम्यान काही शहरात हिंसाचार सुद्धा झाला. नागरिकांकडून दगडफेक व गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. तसेच अनेक पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राभावले आहे.