संशय घेत बदनामी करण्याचा ‘भाजप पॅटर्न’ थांबवा-आप

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या वर्षभरात भाजपा सरकार विरोधात अनेक शांततापूर्ण मूक मोर्चे, आंदोलने, सभा झाल्या. परंतु आंदोलकांच्या मागण्यांना योग्य प्रतिवाद करत, प्रतिसाद देण्याची लोकशाहीतील प्रक्रियाच भाजपा उधळून लावत आहे. भाजपने आता हे संशय घेत बदनामी करण्याचेनवीन धोरण अवलंबले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे पंढरपूर शासकीय पूजा रद्द करताना, तिथे गर्दीत साप सोडला जाणार असून चेंगराचेंगरी घडवून आणली जाईल अशी माहिती मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. वस्तुतः पोलिसांनी माहितीची गुप्तता बाळगत गुन्हेगार पकडणे अपेक्षित असताना, उलट ही माहिती जनतेला सांगून जनतेच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. राज्याचे गृहखाते सुद्धा देवेंद्र फडणवीस सांभाळत असताना तपास यंत्रणा चा वापर जनतेच्या मनात नाहक भीती निर्माण करणे आणि त्यायोगे आंदोलकांना बदनाम करण्यासाठी केला जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

याच पद्धतीने आदिवासी विद्यार्थी मेस चालू व्हावी अशी मागणी करत असताना, आंदोलनकर्ते आदिवासी विद्यार्थीच नाहीत, तेवसतिगृहातील अनधिकृत राहणारे विद्यार्थी आहेत असे म्हंटले. भाजपचे सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तर राहुल गांधी यांनी मोदी गळाभेटीत त्यांना विषारी सुईतर टोचली नसेल ना? अशी शंका ट्वीटर वरून व्यक्त केली आहे! पुण्यामध्ये एल्गार परिषद संबंधित अटक केलेल्या युवकाचा मोदी यांच्या हत्येच्या कटाशी संबंध जोडला -कटाचे कागद सापडले असे सांगत पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु तपासाच्या बाबतीत काहीच सांगितले गेले नाही. आम आदमी पार्टीने हा तपास पुणे पोलिसांनी तातडीने करत जलद कोर्टाद्वारे गुन्हेगारांना शिक्षा द्यावी अशी लेखी मागणी पोलीस कमिशनर यांना केली होती.

परंतु जनतेच्या मनातील अस्वस्थता आणि भीती दूर करण्याऐवजी अर्धे कच्चे आरोप पोलिसांच्या हवाला देत केले जात असून , आंदोलक आणि विरोधक यांची याद्वारे बदनामी करण्याचे धोरण भाजपा राबवत आहे. प्रश्नाची उत्तरे शोधण्याची प्रामाणिक इच्छाचनसल्याने दुसर्यास बदनाम करून मुद्दा वळवणे हे खास भाजप धोरण-‘भाजप पॅटर्न’ आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे!

संभाजी भिडे हे आरएसएसच्या कोअर ग्रुपमधील व्यक्ती !- प्रकाश आंबेडकर

अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन हे फक्त श्रीमंताच स्वप्न-उद्धव ठाकरे