GST- च्या जाहिरातीवरून काँग्रेस ने साधला अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा

केंद्र सरकारनं अमिताभ बच्चन यांना GSTसाठी काँग्रेसने बिग बी अमिताभ बच्चन याना  सूचक इशारा देत बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी GST म्हणजे भाजपचा मूर्खपणा असल्याची खरमरीत टीका केली आहे त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांना देखील या वादात विनाकारण ओढले आहे.GSTविरोधात निदर्शनं सुरू झाल्यास त्याची धग बच्चन यांनाही सोसावी लागेल. त्यांनी भाजपा सरकारच्या मूर्खपणामध्ये सहभागी होऊ नये, असं निरुपम म्हणालेत.
 अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निरुपम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘बहुदा निरुपम बरेच दिवस बातम्यांमध्ये झळकले नसतील, त्यामुळेच त्यांनी बच्चन यांना विरोध केला असेल,’ असं मुनगंटीवार म्हणालेत.