‘माझा अपप्रचार थांबवा, नाहीतर कपडेच उतरवतो’ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची जीभ घसरली

टीम महाराष्ट्र देशा : अमरावती लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी एक विवादास्पद वक्तव्य केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अमरावती मतदारसंघात आमदार रवी राणा यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्याविरोधात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे देवपारे चांगले संतापले असून, ”माझा अपप्रचार थांबवा, नाहीतर कपडेच उतरवतो’ अशी धमकी त्यांनी एका पत्रकार परिषदेत रवी राणा यांना दिली आहे.

दरम्यान, गुणवंत देवपारे यांच्या विरोधात रवी राणा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देवपारे यांच्या विरोधात काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.