सफाई कर्मचाऱ्यांची ‘आर्थिक’ पिळवणूक थांबवा, अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन!

औरंगाबाद : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले मात्र प्रशासन आणि रेड्डी कंपनीद्वारे त्यांची पिळवणूक सुरू आहे. शहरात कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न देता खाजगी कंपनी त्यांची पिळवणूक करीत आहे. कंपनीने हे प्रकार थांबून कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे अशी मागणी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आली आहे. अन्यथा प्रहार स्टाईल पद्धतीने आंदोलनाचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर महासचिव राजू मिसाळ यांच्या वतीने सोमवारी (दि.१९) निवेदन देण्यात आले. त्यानुसार शहरात घरोघरी कचरा संकलन व वाहतुकीचे कंत्राट मिळालेल्या रेड्डी कंपनीकडे सुमारे एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. किमान वेतनानुसार सफाई मजूर व वाहनचालक यांना २४ हजार रुपये प्रति महिना आहे. परंतु चालकांना दहा हजार पाचशे रुपये ठरवून प्रत्येकी आठ हजार पाचशे रुपये सफाई कामगारांना दहा हजार ५०० ठरवून ८ हजार रुपये पगार मिळतो.

कपात झालेल्या रकमेचा कोणताही पुरावा कंपनी कामगारांना देत नाही. उलट वाहनात बिघाड झाला तर कर्मचाऱ्यांना स्वखर्चातून दुरुस्ती करावी लागते. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. मात्र त्याप्रमाणे त्यांना वेतन मिळत नसल्याने अनेकांवर मोठ्या प्रमाणावर कर्ज झाले आहे. कामगारांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी कंपनी व्यवस्थितपणे पार पडत नसल्याचे दिसून येत आहे. हे प्रकार लवकरात लवकर थांबले नाही तर प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP